Advertisement

भीमा-कोरेगाव हिंसाचार: दडपशाहीचं कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबवा- प्रकाश आंबेडकर


भीमा-कोरेगाव हिंसाचार: दडपशाहीचं कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबवा- प्रकाश आंबेडकर
SHARES

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे मुंबईसह राज्यभर पडसाद उमटले. ठिकठिकाणी बंद झाला, जाळपोळ, दगडफेक झाली. या हिंसाचारातील मुख्य आरोपींची अटक राहिली बाजूलाच; पण सद्यस्थितीत मुंबईसह राज्यभरात पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांचं कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. या कोम्बिंग आॅपरेशमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलांना देखील पकडून आत टाकलं जात आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचं म्हणत हे दडपशाहीचं कोम्बिंग आॅपरेशन राज्य सरकारने ताबडतोब थांबवण्याची मागणी भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.


मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावं

१ जानेवारी रोजी झालेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड त्वरीत थांबवू असं, आश्वासन दिलं होतं. पण हे आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. कारण पुण्यासह राज्यभर पोलिसांकडून अजूनही कोम्बिंग आॅपरेशन सुरू असून त्यात अल्पवयीन मुलांना देखील पडकलं जात आहे. या मुलांना पकडून त्यांना बाल न्यायालयापुढे हजर केलं जात आहे. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी आपलं आश्वासन पाळवं आणि त्वरीत कोम्बिंग आॅपरेशन थांबवावं असा पुनरूच्चार आंबेडकर यांनी केला.


मुख्य आरोपी मोकाट

एकीकडे कोम्बिंग आॅपरेशन जोरात सुरू असून अल्पवयीन मुलांना पोलिस उचलत आहेत. पण त्याचवेळी भीमा-कोरेगाव दंगलीचा कट ज्यांनी रचला, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ते संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे मात्र मोकाट आहेत. यांच्याविरोधात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, त्यांना अटक होत नाही. असं का? असा सवाल करत भिडे आणि एकबोटेच्या अटकेची मागणीही त्यांनी उचलून धरली.



हेही वाचा-

महाराष्ट्र बंद: आंदोलनकर्त्यांचं अटकसत्र त्वरीत थांबवा- जोगेंद्र कवाडे

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा