एल्फिस्टन्स पूल दुर्घटना: रेल्वेच्या पादचारी पुलांना 'अत्यावश्यक सुविधे'चा दर्जा

मुंबईत शुक्रवारी झालेल्या एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन पूल दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी चर्चगेटच्या रेल्वे मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी रेल्वेवरील पादचारी पुलांना 'अत्यावश्यक सुविधे'चा दर्जा देण्यात आल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. रेल्वेवरील पादचारी पुलाला १५० वर्षांपासून 'प्रवासी सुविधा' असा दर्जा होता. त्यात बदल करुन आता 'अत्यावश्यक सुविधे'चा दर्जा देण्यात आला आहे.   

त्याचसोबतच, प्रशासकीय किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रेल्वेसंबंधीच्या विविध सुरक्षा विषयक कामांना उशीर होऊ नये म्हणून, रेल्वेतील महाव्यवस्थापकांना सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मुंबईकर प्रवाशांसाठी अशी सुरक्षा व्यवस्था :

  • महाव्यवस्थापकांना प्रवाशांच्या सुरक्षा  प्रकल्पांसाठीच्या खर्चाचे अधिकार
  • मुंबईतील उपनगरीय रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त स्वयंचलीत जिने उभारणार
  • जिने लावण्यासाठी मान्यता देण्यात आली 
  • मुख्यालयातील २०० वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिल्ड ड्युटी देणार
  • पुढील १५ महिन्यांत सर्व उपनगरीय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील
  • देशभरातील ट्रेनमध्ये सीसीटीव्ही लावण्याचं काम केले जाईल
  • रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार पश्चिम आणि पूर्व रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना 
  • बैठकीचे मुद्दे ट्विट  

 


हेही वाचा - 

'या' स्थानकांवरही होऊ शकते चेंगराचेंगरी

आता साडेनऊ कोटी खर्चून एल्फिन्स्टनवर बांधणार पूल


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या