Advertisement

आता साडेनऊ कोटी खर्चून एल्फिन्स्टनवर बांधणार पूल


आता साडेनऊ कोटी खर्चून एल्फिन्स्टनवर बांधणार पूल
SHARES

दसऱ्याचा आदला दिवस रेल्वे प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. पाऊस आणि अफवांनी घात केला नि एल्फिन्स्टन पादचारी पुलावरून जाणाऱ्या 23 निष्पाप प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला. 23 बळी आणि 39 गंभीर जखमी झाल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर त्वरीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेत एल्फिन्स्टनवर नव्या अतिरिक्त पादचारी पुलाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार नव्या अतिरिक्त पादचारी पुलाच्या कामासाठी निविदा मागवण्यात आली आहे. तब्बल साडे नऊ कोटी खर्च करून एल्फिन्स्टन येथे आता नवा पादचारी पुल उभारण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत एल्फिन्स्टन आणि आसपासचा परिसर व्यावसायिकदृष्ट्या विकसित झाला आहे. त्यामुळे नोकरीधंद्याच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या वाढली असून त्याचा भार साहजिकच रेल्वे सेवेवर पडला आहे. त्यातूनच अरूंद अशा एल्फिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावर शुक्रवारी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 23 जणांचा बळी गेला.

दरम्यान, हा पुल अरूंद असून पर्यायी पुल बांधवा वा पुलाचा विस्तार करावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवासी, प्रवासी संघटनांसह सर्वच क्षेत्रातून होत होती. पण रेल्वे प्रशासनाकडून या मागणीकडे साफ काणाडोळा केला जात होता. आता मात्र नवा पादचारी पुल बांधण्यात येणार असून त्यासाठी साडे नऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेमंत्र्यांनी हा साडे नऊ कोटींचा निधी देण्यासही मंगळवारी मंजुरी दिली आहे. 9 नोव्हेंबरला या पुलाच्या बांधकामाची निविदा उघडण्यात येईल आणि त्यानंतर निविदा अंतिम करण्यात येईल. त्यामुळे येत्या काही महिन्यातच या नव्या पादचारी पुलाच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मुंबईतील सर्व रेल्वे पादचारी पुलांचे होणार ऑडिट

रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत मुंबईतील सर्व रेल्वे पादचारी पुलांच्या ऑडिटचेही आदेश दिले आहेत. पश्चिम रेल्वे स्थानकावर 88 पादचारी पुल असून अन्य ठिकाणी 21 पुल आहेत. तर मध्य रल्वेवरील पादचारी पुलाची संख्या 134 आहे. या सर्व पुलांचे ऑडिट आठवड्याभरात सादर करण्याचे आदेशही रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. तर लोकल सेवा मजबुत करण्याच्या दृष्टीने जी काही प्रलंबित कामे आहेत तीही तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा