Advertisement

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी : वरळीच्या मयुरेश हळदणकरचा दुर्दैवी अंत


एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी : वरळीच्या मयुरेश हळदणकरचा दुर्दैवी अंत
SHARES

शुक्रवारी घडलेल्या एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्दैवी घटनेत वरळी येथील 80 नंबर बीडीडी चाळीत राहणाऱ्या मयुरेश हळदणकर या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.

या दुर्दैवी घटनेत आम्ही आमचा मित्र गमावला. मयूर कॉलेजमध्ये शिक्षण घेत जॉब करायचा. शुक्रवारी जॉबला जात असताना हा अनुचित प्रकार घडला आणि यात त्याचा मृत्यू झाला. सध्या मयूरच्या पश्चात त्याची बहीण आत्या आणि वडील आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्यामुळे घरची जबाबदारी त्याच्यावर होती.

ललित साळुंखे, मयुरेशचा मित्र

या दुर्घटनेत मयुरेशचा मृत्यू झाल्यामुळे बीडीडी परिसरातील वातावरण सुन्न झाले आहे. मयुरेश एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल चढत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मयुरेश गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तींचे रंगकाम करत असे. त्यामुळे वरळीतल्या बीडीडी चाळीत तो सर्वांना सुपरिचित होता. मयुरेश वरळीच्या शिवसम्राट मित्रमंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होता.

ब्रिजच्या दुरूस्ती आणि रुंदीकरणासंदर्भात शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. तेव्हा अजय चौधरी यांनी देखील हा विषय उचलून धरला होता. ब्रिटिशकालीन पुलाची पहाणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी देखील केली होती. प्रशासनाने मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजच्या दुर्घटनेत रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

अभिजित पाटील, उपाध्यक्ष, युवासेना, वरळी विभाग



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा