इथोपियन विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग, सर्व प्रवासी...

File Image
File Image

तांत्रिक गोंधळ सापडल्यानंतर इथिओपियन एअरलाइन्सशी संबंधित ET690 विमानानं रविवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) आपत्कालीन लँडिंग केली.

हे विमान सौदी अरेबियाच्या रियाधहून निघाले होते. बंगळुरूला दिशेनं हे विमान निघालं होतं. पण तांत्रिक कारणामुळे मुंबईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

विमानात धूर पसरल्याचं कळताच पायलटनं हा निर्णय घेतला. लँडिंग झाल्यानंतर तपासणी केल्यानंतर हायड्रॉलिक गळती झाल्याचं लक्षात आलं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “विमान सुरक्षितपणे खाली उतरलं आहे,”

अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक बचाव व्हॅन, तीन फायर टेंडर आणि इतर अग्निशामक उपकरणांची विनंती मुंबई फायर ब्रिगेडकडून करण्यात आली होती. शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अग्निशमन दल आणि उपकरणे यांचा स्वतःचा सेट आहे.

पायलेटच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.


हेही वाचा

चर्चगेट परिसरात वाहनं पार्किंग करणं झालं महाग

'काम जास्त पगार कमी', ३ महिन्यांचा पगार न मिळाल्यानं कुर्ला डेपोत कर्मचाऱ्यांचा एल्गार

पुढील बातमी
इतर बातम्या