Advertisement

'काम जास्त पगार कमी', ३ महिन्यांचा पगार न मिळाल्यानं कुर्ला डेपोत कर्मचाऱ्यांचा एल्गार

मागील ३ महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

'काम जास्त पगार कमी', ३ महिन्यांचा पगार न मिळाल्यानं कुर्ला डेपोत कर्मचाऱ्यांचा एल्गार
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) काळात आपला जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (workers) वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर (msrtc) आर्थिक संकट ओढावलं आहे. मागील ३ महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी २ दिवसांत पगाराचा निर्णय झाला नाही तर एसटी बंद आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला (state government) दिला आहे. ३ महिन्यांचा रखडलेला पगार (workers salary) आणि सानुग्रह अनुदान (diwali bonus) देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कोरोनामुळं 'काम जास्त, पगार कमी' अशी परिस्थिती या कर्मचाऱ्यांवर आली आहे. त्यामुळं आधीच तोकडा पगार आणि त्यात ३ महिन्यांचा पगार थकल्यानं एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळी (diwali) तोंडावर आली असताना लहान मुलांना काय उत्तरं देणार? असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (transport minister anil parab) आणि राज्य सरकारला विचारला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा ३ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवता येत नाहीत. अशावेळी जगावं की मरावं असा प्रश्न पडत असल्याची खंत एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवल्याची माहिती समोर येत आहे.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवरच आली असून, कर्मचाऱ्यांचा पगार, इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असल्यानं एसटी महामंडळ २ हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसंच एसटीकडून राज्य सरकारकडं ३६०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं.

कोरोनाच्या काळात एसटीला मिळणारं २२ कोटींचं उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळं एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो. कोरोनामुळं उत्पन्नाची साधनं वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झालं. त्यामुळं हा तोटा वाढला आहे. त्यामुळं कामगारांचे ३ महिन्यांचे पगारही थकले आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा