Advertisement

चर्चगेट परिसरात वाहनं पार्किंग करणं झालं महाग

चर्चगेट येथील काही रहिवाशांकडून मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराने घराबाहेर रस्त्यांवर गाडी उभी करण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराची मागणी केली आहे.

चर्चगेट परिसरात वाहनं पार्किंग करणं झालं महाग
SHARES

मुंबईत पार्किंगचे (parking) दर मोठ्या प्रमाणाच वाढल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या चर्चगेट (churchgate) परिसरात वाहनांच्या पार्किंगचे दर अधिक घेतल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट येथील एका घटनेनुसार, मुंबई महापालिकेच्या (bmc) कंत्राटदारानं येथील नागरिकांकडून घराबाहेरील रस्त्यांवर गाडी उभी करण्यासाठी महिन्याला ५ हजार ५०० रुपयांची मागणी केली आहे.

चर्चगेट येथील काही रहिवाशांकडून मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराने घराबाहेर रस्त्यांवर गाडी उभी करण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराची मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे दर तुमच्या गाडीनुसार ठरत असून, पार्किंगचे एवढे मोठे दर बघून नागरिकांचे डोळेच फिरले आहेत. दरम्यान, अशा प्रकाराची पार्किंग पॉलिसी लागू करण्याऐवजी नागरिकांना दिलासा मिळेल, अशी पॉलिसी लागू करत वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य दर आकारले जावेत, असं म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेचे पार्किंग दर पूर्वीपासूनच वादातीत राहिले आहेत. आणि आता तुमच्या वाहनानुसार तुम्हाला पार्किंगचे दर आकारले जात आहेत. यासाठी महापालिकेनं विभागणी केली आहे. व्यावसायिक (कमर्शियल), निमव्यावसायिक (सेमी-कमर्शियल), निवासी (रेसिडेंशियल) अशी विभागणी करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण मुंबईत अशा प्रकाराच्या पार्किंगचा विचार सुरू आहे.

२४ विभागीय आयुक्तांना तसे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडं मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांनी दक्षिण मुंबईत काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा पार्किंग दर आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र विभागणी करताना कमर्शियल आणि सेमी कमर्शियलमध्ये गोंधळ घालण्यात आला असून, त्यामुळं नागरिकांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा