ठाण्यात 'इथं' सुरू होणार तरंगतं हॉटेल

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि ठाणे महापालिका खाडीत तरंगते हॉटेल सुरू करीत आहे. सी क्रूझ नावाच्या या हॉटेलमध्ये बोटीवरील मेजवानी पर्यटकांना ठाण्यात अनुभवता येणार आहे.

ठाण्यात घोडबंदर रोड वरील गायमुख चौपाटीवर हे हॉटेल सोमवारपासून सुरू होणार आहे. सध्या कोरोना निर्बंधामुळे ५० टक्के क्षमतेनं हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यात ओपन डेक आणि एसी लाँज आहेत. एकूण १०० नागरिक एकावेळी यामध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. या हॉटेलमध्ये सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगते हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे.

यापूर्वी ही संकल्पना मुंबईमध्ये अंमलात आणली होती. मात्र, लॉकडाऊन आणि निर्बंधामध्ये या तरंगत्या हॉटेलची सफर बंद करण्यात आली. या हॉटेलमध्ये जागा बुक करण्यासाठी 200 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील.

गायमुख इथं या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असा नयनरम्य नजारा आहे. द.सी.फ्लोटिंग रेस्टोरेंट या खासगी कंपनीनं हे हॉटेल सुरू केले आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं ही संकल्पना मांडली आहे. ए

या हॉटेलला महाराष्ट्र मेरिटाईन बोर्डनं परवानगी दिली आहे. या जहाजमध्ये सध्या तरी १०० पर्यटक बसू शकतात. तसंच यामध्ये पर्यकटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात आली आहे. लाईफ गार्ड, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

अनुचित घटना घडल्यास महापौर, स्थानिक नगरसेवकही जबाबदार

कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मुंबई महापालिका मदतीचा हात देणार

पुढील बातमी
इतर बातम्या