उरण रेल्वे काॅरिडाॅरच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे सेवा दिवाळीत सुरू

उरण रेल्वे काॅरिडाॅरच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर दिवाळीच्या मुहूर्तावर लोकल सेवा सुरू होणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचा शुभारंभ  होण्याची शक्यता अाहे. 

दुसरा टप्पा २०१९ च्या अखेर

तब्बल १७८२ कोटी रूपयांचा हा उरण रेल्वे काॅरिडाॅरचा पहिला टप्पा अाहे. गुरूवारी मध्य रेल्वेच्या टीमने या मार्गावर घेतलेली चाचणी यशस्वी झाली अाहे. पहिल्या टप्प्यातील मार्गावर तारघर, बामंदोंगरी अाणि खारकोपर ही तीन स्थानके अाहेत. यापैकी तारघर हे गर्दीचे ठिकाण मानले जाते. एलिव्हेटेड रस्त्यांद्वारे तारघर विमानतळाशी जोडले जाणार अाहे. दरम्यान, स्थानकांचे काम अद्याप सुरू अाहे. काम पूर्ण झाल्यावर ट्रेन बामंदोंगरी और खारकोपर या स्थानकांवर थांबेल. उरण रेल्वे काॅरिडाॅरचा दुसरा टप्पा २०१९ च्या अखेरपर्यंत सुरू होणार अाहे. 


हेही वाचा - 

दिवाळीत बेस्टच्या १५४ जादा गाड्या

भारतात धावणार पहिली इंजिन नसलेली ट्रेन


पुढील बातमी
इतर बातम्या