Advertisement

भारतात धावणार पहिली इंजिन नसलेली ट्रेन

भारतात पहिल्यांदाच इंजिनविना रेल्वे रुळावर धावणार आहे. ही ट्रेन एकूण १६ डब्यांची असून या ट्रेनचं नाव ‘ट्रेन १८’ असं आहे. सोमवारी या इंजिन नसलेली ट्रेनची चाचणी चेन्नईमध्ये होणार आहे.

भारतात धावणार पहिली इंजिन नसलेली ट्रेन
SHARES

इंजिन नसेल तर, रेल्वे रुळावर धावूच शकत नाही, असा सर्वांचा समज आहे. परंतु, हा समज आता दूर होणार आहे. कारण भारतात पहिल्यांदाच इंजिनविना रेल्वे रुळावर धावणार आहे.  ही ट्रेन एकूण १६ डब्यांची असून या ट्रेनचं नाव ‘ट्रेन १८’ असं आहे. सोमवारी या इंजिन नसलेली ट्रेनची चाचणी चेन्नईमध्ये होणार आहे. चाचणीत पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर धावणार आहे.


ट्रेनचा वेग वाढणार

‘ट्रेन १८’ या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये १८ महिन्यांमध्ये तयार करण्यात आलं आहे. ही ट्रेन शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. तसंच, या ट्रेनमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन नेहमीच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. या ट्रेनसाठी एकूण १०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.


सोमवारी ट्रेनचं अनावरण

सोमवारी या ट्रेनचं अनावरण झाल्यावर ही ट्रेन रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायजेशनकडे पुढच्या परिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये २ एक्झिक्युटीव्ह कंपार्टमेंट अाहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये ५२ जागा अाहेत. याशिवाय सामान्य डब्यात ७८ जागा अाहेत.


काय आहे या ट्रेनमध्ये?

शताब्दी ट्रेनचा वेग १३० किमी प्रति तास आहे. मात्र, ही ट्रेन १६० किमी प्रति तासाच्या वेगानं धावणार आहे. या ट्रेनमध्ये जीपीएसवर आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे इंजिन नसलेली 'ट्रेन १८' ही ट्रेन कधी प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा - 

नेरूळ ते खारकोपर रेल्वेच्या चाचणीदरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मला घासत गेली पुढे

धक्कादायक! गेल्या ५ वर्षांत रेल्वे ट्रॅकवर १८, ४२३ जणांचा बळी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा