Advertisement

नेरूळ ते खारकोपर रेल्वेच्या चाचणीदरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मला घासत गेली पुढे


नेरूळ ते खारकोपर रेल्वेच्या चाचणीदरम्यान रेल्वे  प्लॅटफॉर्मला घासत गेली पुढे
SHARES

नेरुळ ते उरण असा २७ किमीचा नवा रेल्वेमार्ग रेल्वेकडून विकसित करण्यात येत आहे. या मार्गातील नेरुळ ते खारकोपर हा १२ किमीचा रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वेने दिवाळीचा मुहूर्त शोधला आहे. त्यानुसार हा मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वेने गुरुवारी या मार्गावर रेल्वेची-लोकलची चाचणी घेतली. पण यावेळी बांधकामातील मोठ्या चुका निर्दशनास आल्या आणि त्यामुळे चाचणी फसली. दोन प्लॅटफॉर्ममधील अंतर कमी असल्याने चचणीसाठी ट्रॅकवर उतरलेली लोकल चक्क प्लॅटफॉर्मला घासत पुढं गेली.


बांधकाम पूर्ण

नवी मुंबई आणि उरण ही शहर एकमेकांशी जोडण्यासाठी २७ किमीचा नेरुळ ते उरण मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गावरील नेरुळ ते खरकोपर या २ किमीच्या रेल्वे मार्गाचं बांधकाम पूर्ण झाल आहे. सिडको आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून हा मार्ग उभारण्यात आला असून त्याच बांधकाम सिडकोने केलं आहे. या मार्गावर १२ डब्यांच्या ११ रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत.


चाचणी फसली

हा मार्ग दिवाळीत सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नेरुळ सिवूडस्, सागरसंगम, तरघर बामनडोंगरी आणि खरकोपर अशी स्थानक असलेल्या या मार्गावर गुरुवारी चाचणी घेण्यात आली. पण ही चाचणी फसली ती सिडकोच्या चुकीच्या बांधकामामुळे.

दोन प्लॅटफॉर्ममध्ये अंतर कमी असल्याने चाचणीसाठी ट्रॅकवर उतरलेली रेल्वे प्लॅटफॉर्मला घासत गेली. त्यामुळे आता पुढे रेल्वे काय निर्णय घेणार, दिवाळीत हा मार्ग सुरू होणार का? हे आता लवकरच समजेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा