बफरला लोकल धडकल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बफरला हार्बर मार्गावरील लोकल धडकल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने लोकलचा वेग धीमा असल्यानं कोणताही जीवितहानी झालेली नाही. परंतु, मोटरमननं तातडीनं ब्रेक दाबल्यानं लोकलच्या डब्यांना हादरा बसला. 

वाहतूक विस्कळीत

बोलापूर लोकल सीएसएमटीवरील हार्बर मार्गावर घडलेल्या या घटनेनंतर लोकल वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. लोकल बफरला धडकल्यामुळं डब्याचे अलाइनमेंटबी अस्तव्यस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. तसंच बफरला धडकल्यानं लोकलच्या डब्यांना बसलेल्या झटक्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 

वाहतूक पुर्वरत

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं दखल घेत धडकलेली लोकल तातडीनं मागे घेत मार्ग मोकळा केला. तसंच, काही काळासाठी बंद पडलेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. 


हेही वाचा -

अनारक्षित रेल्वे प्रवासासाठी आता ‘बायोमेट्रिक टोकन’

मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर


पुढील बातमी
इतर बातम्या