Advertisement

अनारक्षित रेल्वे प्रवासासाठी आता ‘बायोमेट्रिक टोकन’

अनारक्षित मेल व एक्स्प्रेस गाड्यांची जनरल तिकिटे खरेदी केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवून ‘बायोमेट्रिक टोकन’ दिले जाणार आहे. गाडी सुटण्यापूर्वी हे टोकन दाखवताच त्यांना बुकिंगच्या वेळेप्रमाणं आसनं देण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे.

अनारक्षित रेल्वे प्रवासासाठी आता ‘बायोमेट्रिक टोकन’
SHARES

लांबपल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण आता, रेल्वे प्रवाशांची लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल तिकिटांसाठी लागणाऱ्या लांब रांगा आणि आसनं पकडण्यासाठी होणाऱ्या धक्काबुक्कीमधून सुटका होणार आहे. अनारक्षित मेल व एक्स्प्रेस गाड्यांची जनरल तिकिटे खरेदी केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवून ‘बायोमेट्रिक टोकन’ दिले जाणार आहे. गाडी सुटण्यापूर्वी हे टोकन दाखवताच त्यांना बुकिंगच्या वेळेप्रमाणं आसनं देण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे.

हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

जनरल तिकिटावर आसन क्रमांक नसल्यानं अनारक्षित गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं. प्रवासी रांगेमध्ये उभं असतात. मात्र, आसनासाठी काही प्रवासी या रांगेमध्ये घुसखोरी करतात. त्यामुळं रांगेत उभं राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळं प्रवाशांचे हाल आणि गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे आता हायटेक तंत्रज्ञान वापरणार आहे.


बायोमेट्रिक टोकन’

जनरल तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन त्याचे ‘बायोमेट्रिक टोकन’ प्रवाशांना देण्यात येणार आहे. प्रवासाच्या एक दिवसापूर्वी हे टोकन घेता येणार आहे. प्रवाशांनी हे टोकन गाडी सुटण्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्यास त्यांना तिकिटांच्या वेळेप्रमाणं आसनं देण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

धारावीत घराचा भाग कोसळून ८ जण जखमी

मुंबई विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा