डेक्कन क्वीनच्या ‘डायनिंग कार’ला मिळणार नवा साज

मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन क्वीन एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील खानपान व्यवस्थेच्या ऐतिहासिक 'डायनिंग कार'ला नवीन साज मिळणार आहे. बिगर वातानुकूलित असलेली डायनिंग कारमध्ये बदल करण्यात येणार असून नव्या रुपात आणताना वातानुकूलित असणार आहे. तसंच, आतील अंतर्गत सजावटीवर देखील भर देण्यात आला असून, नव्या रुपातील डेक्कन क्वीन एक्स्प्रेस डिसेंबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

एलएचबी कोच

रेल्वे मंत्रालयानं देशभरातील सर्वच गाड्या या एलएचबी कोच प्रकारातील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एखादा अपघात झाल्यास जिवीतहानी कमी होते, तसंच गाडीचा वेगही वाढण्यास मदत मिळते. साधे डबे एलएचबी प्रकारात रुपांतर करताना त्यातील अंतर्गत सजावटीवरही भर दिला जातो. त्यानुसार डेक्कन क्वीनमध्येही बदल करण्यात येणार आहेत. मात्र हे बदल करताना डायनिंग कार काढून टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, याला प्रचंड विरोध झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची मागणी

मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. १ जून १९३० साली प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या या गाडीला डायनिंग कार आहे. स्वतंत्र डायनिंग कार असलेली पहिली गाडी असून, या गाडीच्या डायनिंग कारमध्ये आरामात बसून खाद्यपदार्थाचा आस्वादही घेता येतो

डेक्कन क्वीनची बांधणी

डेक्कन क्वीन ही १७ डब्यांची असून तिला सध्यस्थितीत साधे डबे आहेत. मात्र, आता चेन्नईतील रेल्वे कारखान्यात नवीन डेक्कन क्वीनची बांधणी केली जात असून, त्याचे डबे एलएचबी प्रकारात असणार आहेत. परंतु, सध्याच्या डेक्कन क्वीनला असलेली डायनिंग कारला एसी नाही. मात्र, येणारी डायनिंग कार एसी असणार आहे. तसंच, खिडक्या मोठ्या स्वरुपात काचेच्या असणार आहेत. या कारमध्ये मोकळी जागा बरीच निर्माण करण्यात येणार असल्यानं बसण्याची व्यवस्थाही उत्तम असणार आहे.


हेही वाचा -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी मुंबईत

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कामगार बेमुदत संपावर


पुढील बातमी
इतर बातम्या