Advertisement

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कामगार बेमुदत संपावर

वेतन कराराबाबत बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाला असतानाच, बेस्ट वर्कर्स युनियनने वेतनावरून ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.

९ ऑक्टोबरपासून बेस्ट कामगार बेमुदत संपावर
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा बेस्ट कामगरांच्या संपाला समोरं जाव लागण्याची शक्यता आहे. कारण, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनकराराचा वाद आता अधिकच चिघळत चालला आहे. मात्र, वेतन कराराबाबत बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाला असतानाचबेस्ट वर्कर्स युनियननं वेतनावरून ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपाबाबत बेस्ट वर्कस युनियननं बेस्ट प्रशासनाला पत्र पाठवलं आहे. 

प्रशासनाला नोटीस

बेस्ट वर्कर्स युनियननं औद्योगिक विवाद कायदा,१९४७ कलम २२() अन्वये प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. तसंच, ७ मागण्या केल्या आहेत. युनियनतर्फे १६ मे २०१६, ६ ऑगस्ट २०१९ रोजी सादर केलेल्या पर्यायी मागण्यांच्या पत्राच्या आधारे बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम करण्याची प्रमुख मागणी आहे. बेस्ट वर्कर्स युनियनसोबत जोपर्यंत अंतिम करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अंतरिम वाढ देण्याची मागणी केली आहे. मुंबई पालिकेचा बेस्ट उपक्रमासंबंधित '' अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावांची अमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

दिवाळी बोनसची मागणी

बेस्ट कामगारांना पालिका कर्मचाऱ्यांस २०१६-१७, १७-१८, १८-१९ मध्ये जाहीर झालेल्या दिवाळी बोनस रक्कम देण्यात यावी. अनुकंपा भरती तातडीने सुरू करण्यासह बेस्ट बसचा ताफा ३,३३७ इतका करण्यासाठी उपक्रमानं तातडीनं स्वत:च्या मालकीच्या बस घ्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय, बेस्ट उपक्रमाच्या आस्थापना सूचीवरील पदसंख्येनुसार रिक्त जागा तातडीनं भरण्याच्या मागणीचाही समावेश आहे.



हेही वाचा -

मुंबईतील विमानतळावर विमानं उतरली विरुद्ध दिशेनं

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा