Advertisement

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी


मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी
SHARES

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावल्यावं अनेक चाकरमान्यांचे होत आहेत. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून, जोरदार पाऊस कोसळत आहे.


रेड अलर्ट


भारतीय हवामान विभागानं गुरूवारी मुंबईत रेड अलर्टचा इशारा दिला होता. परंतु, या रेड अलर्टच्या अंदाजानुसार मुंबईत कमी पाऊस पडला असून, शुक्रवारी पावसानं जोर धरला आहे. जोरदार पावसामुळं सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.


विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. तसंच, रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. याबाबत पश्चिम रेल्वेनं ट्विटरवरून माहिती दिली आहे.
हेही वाचा -

अमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय