वरळी-वांद्रे सी-लिंकवरील टोलमध्ये वाढ

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सी-लिंकवरील टोलमध्ये १ एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नियामानुसार दर ३ वर्षांनी टोलमध्ये वाढ करण्यात येते. त्यामुळं आता मुंबईतील वांद्रे ते वरळी सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्यांना गुरुवारपासून टोलपोटी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

जवळपास १८ टक्क्यांनी ही दरवाढ झाली असून मोटारगाड्या आणि लहान वाहनांसाठी ८५ रुपये, मिनीबस सदृश्य वाहनांसाठी १३० रुपये, तर बस-ट्रकसाठी १७५ रुपये मोजावे लागणार आहेत. लहान वाहनांसाठी १५ रुपये, मध्यम वाहनांसाठी २० रुपये तर अवजड वाहनांसाठी ३० रुपयांनी टोल वाढविण्यात आला आहे.

वरळी-वांद्रे सागरी सेतूवर राज्य सरकारनं टोल वसुलीसाठी २०५२ सालापर्यंत मुदतवाढ दिली आहे. दर ३ वर्षांनी टोलच्या दरात वाढ करण्यास सरकारनं मंजुरी दिली. अंदाजे १८ टक्क्यांनी दरवाढ केली जाते. मासिक पासही वाढणार आहे.


हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण
  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद

पुढील बातमी
इतर बातम्या