'विस्टाडोम' कोचची ही वैशिष्ट्ये मुंबईकरांना नक्कीच आवडतील!

लांबचा प्रवास करताना प्रत्येकाला निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी अगदी विंडो सीटच हवी असते. पण प्रत्येक प्रवाशाला विंडो सीट मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे बाहेरचे निसर्गरम्य वातावरण पाहता येत नाही, म्हणून अनेकांची निराशा होते. पण आता लांबचा पल्ला गाठताना विंडो सीट मिळाली नाही, म्हणून निराश होऊ नका. कारण लवकरच मुंबईकर प्रवाशांसाठी विस्टाडोम कोच उपलब्ध होणार आहेत. हा कोच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय ताफ्यात दाखल झाला आहे.

काय आहेत याची वैशिष्ट्ये?

  • काचेचे छत, फिरती आसने
  • सीटवरून बसल्या जागी बाहेरील निसर्गरम्य वातावरण पाहता येईल
  • पूर्णपणे वातानुकूलित कोच
  • विशेष पद्धतीने डिझाईन केलेला कोच
  • जीपीएस यंत्रणा, एलईडी दिवे
  • सूचना यंत्रणा
  • 40 आरामदायक फिरत्या खुर्च्या
  • अत्याधुनिक पद्धतीचे चालू-बंद होणारे स्वयंचलित दरवाजे
  • 12 एलसीडी स्क्रीन, मोठ्या पारदर्शक खिडक्या
  • फ्रीझर, ओव्हन, ज्युस ग्राइंडर
  • लगेज ठेवण्यासाठी विशेष जागा

यापूर्वी विशाखापट्टणम ते अरकून दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला विस्टाडोम कोच जोडण्यात आला असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यानंतर प्रथमच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात हा कोच आणण्यात आला आहे. चेन्नईच्या रेल्वे फॅक्टरीत याचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्ग सौंदर्य पाहता यावे, या उद्देशाने रेल्वेचा हा नवा डबा तयार करण्यात आला आहे. विस्टाडोम कोचमध्ये प्रवासादरम्यान बाहेरील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईत कर्जत, लोणावळा, कसारा, इगतपुरी इत्यादी मार्गावरील निसर्ग सौंदर्य प्रवाशांना या कोचमधून पाहता येणार आहे. हा कोच नेमका कोणत्या गाडीला लावण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, तसेच याचे तिकीट दरही अद्याप ठरवण्यात आलेले नाहीत.

सुनील उदासी, मुख्य जनंसपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


हेही वाचा - 

पश्चिम रेल्वेवर वाढणार फर्स्ट क्लासचे डबे

रेल्वे रुळांवर शौचाला जाल, तर असेही फसाल!

पुढील बातमी
इतर बातम्या