पश्चिम रेल्वेवर वाढणार फर्स्ट क्लासचे डबे

 Mumbai
पश्चिम रेल्वेवर वाढणार फर्स्ट क्लासचे डबे
Mumbai  -  

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे साकाळी-संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी फर्स्ट क्लास डबा असो की सेकंड क्लास दोन्हींत गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे प्रवाशांनी वारंवार तक्रार केल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने फर्स्ट क्लासचे डबे वाढवण्याबाबत विचार सुरू केला आहे. 

गर्दीच्यावेळी सेकंड क्लासने प्रवास करून आपले हाल होण्यापेक्षा प्रवासी फर्स्ट क्लासने प्रवास करणे पसंत करतात. पण जास्त पैसे देऊनही बसायला जागा मिळत नसल्याने प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने फर्स्ट क्लासचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


पश्चिम मार्गावर धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलमध्ये ‘फर्स्ट क्लास’साठी आणखी एक डबा देण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे.

- मुकुल जैन, विभागीय व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

पश्चिम मार्गावर सध्या 15 डब्यांच्या रोज 42 आणि 12 डब्यांच्या 1281 फेऱ्या होतात. 15 डब्यांच्या लोकलमध्ये जो ‘फर्स्ट क्लास’चा डबा असतो त्यामध्ये 252 प्रवासी बसून तर 75 प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील इतकी क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात 12 आणि 15 डब्यांच्या लोकलमधून दिवसाला सुमारे 3.99 लाख प्रवासी करत असतात. सेकंड क्लासच्या तुलनेत फर्स्ट क्लासचे तिकीट महाग आहे. फर्स्ट क्लासची क्षमता वाढवली तर जास्त प्रवासी याने प्रवास करू शकतील आणि त्यातून रेल्वेला जास्त फायदा होऊ शकेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महिलांसाठी विशेष लोकलआणि संपूर्ण एसी लोकल चालवण्यात येत असेल तर फक्त ‘फर्स्ट क्लास’चे डबे असणारी लोकल का सुरू करू नये? असेही रेल्वे अधिकारी म्हणतात.हेही वाचा - 

विरार स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार

'परे'वरही मिळणार स्वस्तात पाणी!Loading Comments