'परे'वरही मिळणार स्वस्तात पाणी!

  Mumbai
  'परे'वरही मिळणार स्वस्तात पाणी!
  मुंबई  -  

  प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांवर हायटेक वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात आले. त्याला प्रवाशांचा चागंला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे आणखी मशिन बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कंपनी लि. (आयआरसीटीसी) कडून ही सेवा सुरू करण्यात आली. पश्मिच रेल्वेच्या विविध स्थानकांवर 37 वाटर व्हेंडिंग मशिन्स बसवण्यात येणार आहेत.


  या स्थानकांवर आहेत व्हेंडिंग मशिन

  'परे'च्या उपनगरीय मार्गावर बोरिवली, दहिसर, माहिम, प्रभादेवी, महालक्ष्मी, नायगाव, डहाणू रोड, मांटुगा रोड, सफाळे, केळवे रोड या स्थानकांवर प्रत्येकी एक, तर चर्नी रोड, खार, लोअर परळ, पालघर, मरीन लाईन्स या स्थानकांवर प्रत्येकी दोन मशिन्स लावण्यात आलेल्या आहेत.


  या स्थानकांवर बसवणार मशिन?

  येत्या काही दिवसांत माहिम, नायगाव, सफाळे, वानगाव, केळवे, वैतरणा, अंधेरी, दादर, विरार, नालासोपारा, भाईंदर, वसई रोड, मालाड, कांदिवली, गोरेगाव, चर्चगेट, वांद्रे, मीरा रोड, सांताक्रूझ, जोगेश्वरी, विलेपार्ले, ग्रँट रोड आणि बोईसर या स्थानकांवर 37 नव्या मशिन्स बसवण्यात येतील.


  पाण्याचे दर

  प्रवाशांना त्यांच्या बाटलीत एक रुपयात 300 मिली, 3 रुपयांमध्ये 500 मिली आणि 5 रुपयांत एक लिटर, 8 रुपयांमध्ये 2 लिटर आणि 20 रुपयांमध्ये पाच लिटर पाणी मिळणार आहे. एक ग्लास पाणी हवे असणाऱ्या प्रवाशांना फक्त 2 रुपयांमध्ये पाणी मिळणार आहे.

  पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय स्थानकांमधील मरीन लाईन्स ते डहाणू या मार्गादरम्यान 20 वॉटर व्हेंडिंग मशिन्स लावण्यात आलेल्या आहेत. पश्चिम रेल्वेला 321 वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसवण्याची परवानगी रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेली आहे. त्यापैकी 166 मशिन्स पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध असून त्यापैकी 161 मशिन्स विविध स्थानकांवर लावण्यात आलेल्या आहेत.  हेही वाचा -

  चाकरमान्यांची तहान भागवण्यासाठी 'वॉटर व्हेंडिंग' मशिन


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.