Advertisement

'परे'च्या प्रवाशांसाठी स्टेशनवर शुद्ध पाणी


'परे'च्या प्रवाशांसाठी स्टेशनवर शुद्ध पाणी
SHARES

वाढत्या प्रवासी संख्येमुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शुद्ध पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रलसह 6 विभागांमधील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ पाणी मोफत मिळणार आहे.


प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी

पश्चिम रेल्वेवरील 360 स्थानकांवर वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. सामाजिक जबाबदारी (सीएसआर) योजनेंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या अल्ट्रा फिल्ट्रेशन वॉटर प्युरिफायर यंत्रणेसाठी सीएसआर योजनेच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेशी करार करण्यात आला आहे.

या यंत्रणेत प्रतितास 100 लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. येत्या दोन आठवड्यात 360 रेल्वे स्थानकांवर ही यंत्रणा सुरू होणार आहे. दोन महिन्यांतून एकदा या यंत्रणेची साफसफाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार यंत्रांच्या देखभालीसाठी रेल्वे अभियंता देखील पाहणी करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.




हेही वाचा - 

सीसीटीव्हीमुळे पश्चिम रेल्वे लाईन अधिक सुरक्षित होणार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा