Advertisement

सीसीटीव्हीमुळे पश्चिम रेल्वे लाईन अधिक सुरक्षित होणार


सीसीटीव्हीमुळे पश्चिम रेल्वे लाईन अधिक सुरक्षित होणार
SHARES

मुंबई - रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी २ हजार ४४८ सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. यामुळे रेल्वे हद्दीत होणाऱ्या घटनांमध्ये पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास मदत होईल.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या १ हजार १०३ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. रेल्वे स्थानक परिसरात चोरी, खून, विनयभंग, लहान मुलांचे अपहरण इत्यादी गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. या वेळेस सीसीटीव्हीची मदत फायदेशीर ठरत आहे. सीसीटीव्हीमुळेच गुन्हेगाराला पकडणे आणि संशयित व्यक्ती पकडण्यास मदत होते. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेतर्फे आणखी १ हजार ७१२ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी दिली. 

पश्चिम रेल्वेच्या रेल्वे स्थानकातील काही कॅमेरे प्रवेशद्वारांजवळ, तिकीट खिडक्यांजवळ बसवले जाणार आहेत. त्यामुळे अनधिकृत फेरीवाले, तिकीट दलालांवरही कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. पश्चिम रेल्वे मार्गांवर सीसीटीव्हींबरोबरच सुरक्षा प्रणालीअंतर्गत (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम) ४३६ कॅमेऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. तर केंद्राच्या निर्भया निधीतूनही ३०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. साधारपणे येत्या दोन वर्षांच्या आत एकूण २ हजार ४४८ नवीन सीसीटीव्ही बसवण्यात येतील. त्यामुळे सीसीटीव्हींची संख्या ही ३ हजार ५५१ पर्यंत होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा