पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवी 'दिशा'

 Mumbai
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवी 'दिशा'

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘दिशा’ नावाचे अ‍ॅप रविवारपासून प्रवाशांसाठी उपब्लध करून दिले आहे. आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना स्थानकांची इत्थंभूत माहिती, फलाटांवरील सुविधा, अत्यावश्यक सेवा यांचा तपशील या अ‍ॅप द्वारे मिळणार आहे.

रविवारी या अ‍ॅपचे प्रकाशन पश्चिम रेल्वेतर्फे सुरतमध्ये करण्यात आले. जानेवारी महिन्यात याची चाचणी करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांनी एकदा हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर पुन्हा इंटरनेटची गरज लागणार नाही.

काय आहे दिशा अ‍ॅपमध्ये

- स्थानकावरील अधीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस, बुकिंग क्लार्क यांची कार्यालये

- स्थानकात प्रवेश करण्याच्या जागा, पादचारी पूल, भुयारी मार्ग, सरकते जिने, रॅम्प, लिफ्ट

- खानपानासाठीच्या सुविधा, प्रत्येक फलाटवर असलेले स्टॉल, वॉटर व्हेंडिंग यंत्रे, फूड प्लाझा, पाणपोया

- मोठ्या स्थानकांवरील प्रतीक्षालये, अतिथी कक्ष

- स्थानकामधील स्वच्छतागृहे, प्रसाधनगृहे  

- तिकीट खिडक्या, तिकीट आरक्षण केंद्रे, एटीव्हीएम, एटीएम यंत्रे, आपत्कालीन वैद्यकीय मदत कक्ष

Loading Comments