वाशिंद-आसनगावदरम्यान रुळावर घातपाताचा प्रयत्न, गुन्हा दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मध्य रेल्वेच्या रुळावर लोखंडी रॉड ठेवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचाच प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. मध्य रेल्वेच्या वाशिंद-आसनगावदरम्यान लोखंडी रॉड टाकून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, याविरोधात रेल्वे प्रशासनानेही कडक पावलं उचलत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोखंडी रॉड जाणून बुजून ठेवला?

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे या गाडीचा अपघात टळला. लोखंडी रॉड जिथे टाकण्यात आला होता, त्यापासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वेचं फाटक आहे. या लांब पल्ल्याच्या गाडीआधी काही मिनिटे उपनगरीय गाडी त्याच ट्रॅकवरून रवाना झाली होती. त्यामुळे खूप कमी वेळात त्या ट्रॅकवर हा लोखंडी रॉड कुणीतरी जाणूनबुजून ठेवला असावा, असा निकष मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी लावला आहे. या संपूर्ण घटनेचा गांभिर्यतेने विचार केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

आणि ही दुर्घटना टळली

आतापर्यंत मध्य रेल्वेच्या दिवा, पनवेल रेल्वे मार्गावर लोखंडी रॉड किंवा रुळ टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती ८ एप्रिलला रात्री दीडच्या सुमारास घडली. पण, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे समोरून येणाऱ्या गाडीलाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आणि ही दुर्घटना टळली. त्यामुळे या मोटरमनचं रेल्वे प्रशासनाने बुधवारी भरभरून कौतुक केलं.


हेही वाचा - 

रेल्वे रुळावर पुन्हा घातपाताचा प्रयत्न

पुढील बातमी
इतर बातम्या