Advertisement

रेल्वे रुळावर पुन्हा घातपाताचा प्रयत्न


रेल्वे रुळावर पुन्हा घातपाताचा प्रयत्न
SHARES
Advertisement

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे रुळावर लोखंडी रॉड सापडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना मंगळावारी रात्री 11.15 च्या सुमारास घडली. हार्बर मार्गावरून अंधेरी ते सीएसटीला जाणाऱ्या लोकलच्या खाली रे रोड स्थानकावर लोखंडी रॉड सापडला.

 लोकल रे रोड स्थानकावरून 300 फूट अंतरावर गेली असता अचानक रेल्वे रुळातून खडखड असा मोठा आवाज आला. त्यामुळे मोटरमन आनंद कुमार यांनी तत्परता दाखवत जागीच लोकल थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी गर्दुल्ल्यांना अटक केली आहे. अजिज हुसेन आणि मोहर अली शुकर अली शेख अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी अधिक तपास केला असता हे दोघे भंगार विकायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

त्या संशयावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. हे दोघेही गर्दुल्ले असल्याची माहिती प्राथमिक तपासात पोलिसांना मिळाली. मंगळवारी या आरोपींनी लोखंडी रॉड चोरला. तसेच तो विकण्यासाठी त्यांनी सॅडहर्स्ट रोडवरून गाडी पकडली. त्यांना तो तोफखाना येथील भंगारवाल्याला विकायचा होता. त्यामुळे त्यांनी रे रोडच्या आधी तोफखाना येथे रॉड फेकला पण दुर्दैवाने तो पलिकडे अप ट्रॅकवर पडला आणि चोर पोहोचण्याआधीच अप ट्रॅकवरून येणारी गाडी त्या रॉडला आदळली.

रॉड उचलायला पोलिसांनी घेतली चक्क आरोपींची मदत
या आरोपींनी रॉड फेकला खरा पण त्यांना हे हे माहित नव्हतं की त्याला गाडी आदळली आहे. फेकलेला रॉड उचलण्यासाठी ते रे रोडवरून परत मागे गेले तेव्हा तिथे रॉड उचलण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती. त्यावेळी पोलिसांनी यातील एकाची रॉड उचलण्यासाठी मदत घेतली आणि त्यानेही संकोच न बाळगता पोलिसांना मदत केली.

संबंधित विषय
Advertisement