Advertisement

सीएसटीएम-मस्जिद दरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड, मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला


सीएसटीएम-मस्जिद दरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड, मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला
SHARES

हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लोखंडी रॉडमुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी घातपाताची शक्यता मात्र नाकारता येत नसल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं आहे.


मोठा अनर्थ टळला

सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास हार्बर मार्गावरील मस्जिद स्थानकाजवळ अप मार्गावर तीन लोखंडी रॉड पडल्याचे मोटरमन अनुराग शुक्ला यांना दिसले असता त्यांनी तातडीने लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर हे लोखंडी रॉड बाजूला करून लोकलला रवाना करण्यात आले.

सध्या आरपीएफने हे लोखंडी रॉड आपल्या ताब्यात घेतले असून चौकाशीला सुरूवात केली आली आहे. जीआरपीदेखील चौकशी करत असल्याचं समोर आलं आहे.या स्थानकांवरही घडली अशीच घटना

याआधीदेखील मध्य रेल्वेच्या सीएसटीएम आणि मस्जिद स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रूळ टाकण्यात आला होता. त्याचबरोबर दिवा स्थानकाजवळ देखील असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळे या घटनेला देखील तपास यंत्रणानी गाभिर्याने घेतल्याचं समजतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा