रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याची थरारक सुटका करणारा देवदूत मयुर शेळके (Mayur Shelke) याच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. जावा कपंनीनं मयुर शेळकेला मोटारसायकल देणार असल्याचं घोषित केलं आहे.

जावा कंपनीकडून मयुर शेळकेला एक जावा मोटार सायकल देऊन गौरव करण्यात येत आहे, असं ट्विट जावा कपंनीचे अनुपम थरेजा यांनी केलं आहे.

१७ एप्रिलला वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह फ्लँटफाँर्मवर चालत होती. त्यावेळी मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रँकवर पडला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगानं एक्सप्रेसही येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या ७ सेकंदात मयुर शेळकेनं लहान मुलाचा जीव वाचवला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रेल्वे मत्रांलयातर्फे मयुर शेळकेला ५० हजार देऊन सन्मान करण्यात आला. एवढंच नाही तर मयुरच्या शौर्याची दखल थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही घेतली. मयुर शेळकेला फोन करुन उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही” अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली.”


हेही वाचा

गावाला जाण्यासाठी परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबासह लांबच लांब रांगा

बेस्टच्या प्रवासी संख्येत घट; तब्बल ९ लाख प्रवासी घटले

पुढील बातमी
इतर बातम्या