Advertisement

रेल्वे स्टेशनवर चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मयुरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मयुरच्या शौर्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून घेतली.

रेल्वे स्टेशनवर चिमुरड्याचे प्राण वाचवणाऱ्या मयुरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
SHARES

वांगणी स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याची थरारक सुटका करणारा मयुर शेळके याचं सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वेकडून सन्माम मिळाल्यानंतर आता खुद्द मयुरच्या शौर्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही घेतली.

मयुर शेळकेला फोन करून उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलंय. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही” अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मयुरनं रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले होते. मध्य रेल्वेने त्याला ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करत सन्मानित केलं.

रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगानं एक्स्प्रेस येत होती.

आई जीवाच्या आकांतानं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यानं अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



हेही वाचा

राज्यातील 'इतक्या' रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर

अखेर मध्य रेल्वेची 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' रवाना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा