Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

राज्यातील 'इतक्या' रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर

राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारक असून, त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

राज्यातील 'इतक्या' रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर
SHARES

राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगानं राज्य शासनानं राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाबाबत आढावा घेण्यासाठी मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी बैठक घेतली.

राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारक असून, त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या करीता रिक्षा परवाना धारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. यासाठी 'सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम  वेळेवर अदा करता येईल', असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा