Advertisement

बेस्टच्या प्रवासी संख्येत घट; तब्बल ९ लाख प्रवासी घटले

बेस्टच्या प्रवासीसंख्येत घट झाली आहे. गेल्या १५ दिवसांत ९ लाख प्रवासी घटले आहेत.

बेस्टच्या प्रवासी संख्येत घट; तब्बल ९ लाख प्रवासी घटले
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारनं संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही, मुंबईतील रस्त्यांवर अजूनही वाहनांची गर्दी कायम आहे. अशातच या निर्बंधांमुळं मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या प्रवासीसंख्येत घट झाली आहे. गेल्या १५ दिवसांत ९ लाख प्रवासी घटले आहेत.

कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनीही जागोजागी नाकाबंदी, वाहनांची झाडाझडती सुरू केली. मात्र, लॉकडाऊनच्या तुलनेत कडक निर्बंधांमधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह विविध सेवा, उद्योगांना मुभा देण्यात आली. त्यामुळे बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा, अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने, या सेवांमध्ये कार्यरत व्यक्तींची खासगी वाहनांसह परवानगी असलेल्या सेवांशी निगडित वाहने रस्त्यांवर उतरली. 

पोलिसांनी शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांची दहिसर, मुलुंड, ऐरोली टोल नाक्यावर झडती घेण्यास सुरुवात केल्यानं वाहनं खोळंबली. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह शहरात विविध ठिकाणी मेट्रो, उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणीही नेहमीप्रमाणे वाहनांचा वेग मंदावला. शहरांतर्गत किराणा, औषधे, भाजीपाला विकत घेण्यासाठी नागरिक बाहेर पडले. त्यामुळे रहदारीत  भर पडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य सरकारनं बुधवारी रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अतिशय तातडीचे काम असलेल्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा  आहे. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झाला आहे. १५ एप्रिलला बेस्टच्या प्रवाशांची संख्या १४ लाख १२ हजापर्यंत  घटली. तर बेस्टला के वळ १ कोटी ३ लाख ८५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.

गेल्या १५ दिवसांत बेस्टची प्रवासी संख्या नऊ लाख २८ हजारांनी कमी झाली असून बेस्टचे उत्पन्न ७४ लाख ६२ हजार रुपयांनी आटले आहे. १ एप्रिलला बेस्ट बसमधून २३ लाख ४० हजार नागरिकांनी प्रवास केला होता. यातून बेस्टला एक कोटी ७८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. तर १५ मार्चला बेस्ट बसमधून २५ लाख १५ हजार प्रवाशांनी प्रवास के ला होता. मात्र राज्य सरकारने ५ एप्रिलला राज्यभरात जमावबंदीचा आदेश लागू के ला. करोना संसर्ग रोखण्यासाठी बेस्टच्या प्रवासी संख्येवर मर्यादा आणली. तसेच बेस्ट बसमधून उभ्याने प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यानंतर बेस्टचे प्रवासी काही प्रमाणात घटले होते.

शनिवारी आणि रविवारी संचारबंदी असल्याने १० एप्रिलला के वळ ७ लाख ६६ हजार नागरिकांनी बेस्टने प्रवास के ला. तर ११ एप्रिलला रविवारी ६ लाख १८ हजार नागरिकांनी प्रवास के ला होता. मंगळवारी १३ एप्रिलला बेस्ट बसला १५ लाख २१ हजार प्रवासी मिळाले होते. तर १४ एप्रिलला बेस्ट बसमधून सुमारे १६ लाख नागरिकांनी प्रवास केला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा