मुंबईतील विमानतळावर विमानं उतरली विरुद्ध दिशेनं

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानं विरुद्ध दिशेकडून उतरल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही विमानं आंतरराष्ट्रीय विमानतळावर विरुद्ध दिशेकडून उतरल्याचं समजतं. मात्र, याआधी विमानं विरुद्ध दिशेनं उतरविण्यात आली नव्हती. त्यामुळं या मागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

जोरदार पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी रात्री जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळं काही विमानं विलेपार्ले बाजूनं खाली उतरलीवैमानिकांना कमी दृष्यतेत खाली उतरण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आयएलएस प्रणाली लहानसा बिघाड झालात्यामुळं काही वेळासाठी विमानांच्या दिशेत बदल करण्यात आला.

२ धावपट्ट्या

मुंबईतील विमानतळाला २ धावपट्ट्या असून, मुख्य धावपट्टी घाटकोपर ते विलेपार्ले आहे. तर दुसरी धावपट्टी अंधेरी ते कुर्ला आहेघाटकोपर ते विलेपार्ले या धावपट्टीवर सर्व विमानं घाटकोपर बाजूनं खाली उतरतात व विलेपार्ले बाजूनं उडातान हवेत झेपावतात. तसंच, अंधेरी ते कुर्ला आहे धावपट्टीवर सर्व विमानं कुर्ला बाजूनं खाली उतरुन अंधेरी बाजूनं हवेत झेपावतात.


हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

मुंबईकरांनो सावधान... मुंबईतल्या बहुतांश भागात गॅस गळती


पुढील बातमी
इतर बातम्या