मुंबईकरांनो सावधान... मुंबईतल्या बहुतांश भागात गॅस गळती

मुंबईतल्या बहुतांश भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत आहेत. गॅस गळती संदर्भात ट्वीटरवर देखील अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.

  • मुंबईकरांनो सावधान... मुंबईतल्या बहुतांश भागात गॅस गळती
SHARE

मुंबईकरांनो सावधान... मुंबईतल्या बहुतांश भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत आहेत. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला, गोरेगाव पूर्व अशा विविध भागातून लोक अग्निशमन विभागाकडे संपर्क करत आहेत. या भागातील रहिवाशांना परिसरात एकप्रकारचा केमिकलटा वास येऊ लागला. त्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाकडे तक्रार दाखल केली.


गॅस गळती संदर्भात ट्वीटरवर देखील अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. राधिका शर्मा या महिलेनं मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्वीटरवर गॅस गळती संदर्भात माहिती दिली. मुंबई पोलिसांनी राधिका यांच्या ट्वीटला तात्काळ उत्तर दिलं. “स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद,” असा रिप्लाय राधिकाला पोलिसांनी दिला.

“नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत अग्निशमन विभागाच्या गाड्या गळतीच्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत. तपासणी करण्यासाठी ९ फायर इंजिन्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अधिक माहितीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा,”अशी माहिती महापालिकेनं ट्वीटरवर दिली आहे.

पालिकेनं दुसरं ट्वीट करत म्हटलं की, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गळती झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र आरसीएफमध्ये गॅस गळती झालेली नाही अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.

तुमच्या इथं देखील गॅस लिक झाल्यासारखा वास येत असेल तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गॅस पाईपलाईनचा मेन कॉक बंद ठेवा.संबंधित विषय
ताज्या बातम्या