मध्य रेल्वेच्या स्थानकांवरही एलईडी लाइट

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेच्या ४३२ स्थानकांवरही एलईडी लाइट्स बसवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने उर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत एकूण ४३२ स्थानकांवर एलईडी लाइट्सचा प्रकल्प यशस्वीरितीने पूर्ण करून दाखवला आहे.

रेल्वेच्या एलईडी लाइटमुळे वीज बिलात मोठी बचत होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.

वीज बिलात बचत

मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीसाठी एलईडी बल्ब लावण्यावर भर दिला. त्याअंतर्गत मध्य रेल्वेच्या ४३२ स्थानकांवर एलईडी लाइट बसविण्यात आली असून मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ या विभागातील स्थानकांचा यांत समावेश आहे. दरवर्षाला ६९.३८ लाख यूनिट्समधून विजेच्या बिलातून ५.३२ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

शिवाय, सर्व रेल्वे कोचमध्ये, निवासी क्वाटर्स, कार्यशाळा आणि इतर कार्यालयांमध्येही एलईडी लाइट्स बसवण्याचं मध्य रेल्वेचं लक्ष्य असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं.


हेही वाचा-

फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या