पश्चिम रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत मुंबई सेंट्रल स्थानकावर एलईडी दिवे लावले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या ६ विभागातील ७२६ स्थानकांवर एलईडी लाईट बसवण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई सेंट्रल या स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या एलईडी लाईट्समुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने ऊर्जाबचतीसाठी एलईडी दिवे लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत मध्य रेल्वेच्या ७२६ स्थानकांवर एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.
यातून ६.८३ दशलक्ष युनिट वीजेची बजत होणार असल्याने रेल्वेचे ५.०३ कोटी रुपये वाचणार आहेत. पश्मिच रेल्वेच्या ६ विभागातील मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या स्थानकात एलईडी लाइट बसवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-
फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची कारवाई
बोरीवली स्थानकातील 'हा' पादचारी पूल ३० मार्चपर्यंत बंद