Advertisement

बोरीवली स्थानकातील 'हा' पादचारी पूल ३० मार्चपर्यंत बंद

बोरीवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८, ९ आणि १० च्या पूर्वेकडील पुलाचं विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार १५ मार्चपासून हे काम हाती घेण्यात आलं असून ३१ मार्चपर्यंत हा पूल रुंदीकरणाच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे.

बोरीवली स्थानकातील 'हा' पादचारी पूल ३० मार्चपर्यंत बंद
SHARES

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकातील पादचारी पुलाचं रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे, हा पादचारी पूल येत्या ३० मार्चपर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


खबरदारीचा उपाय

२९ सप्टेंबर २०१७ ला एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून काही रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलाची कामं हाती घेतली आहे. त्यातील बहुतेक स्थानकातील पादचारी पुलांचं विस्तारीकरण करण्यात आलं आहे. त्यानुसार बोरीवलीतील या पुलाचं देखील विस्तारीकरण करण्यात येत आहे.



रूंदी दुप्पट होणार

प्लॅटफॉर्म क्रमांक ८, ९ आणि १० च्या पूर्वेकडील पुलाचं विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार १५ मार्चपासून हे काम हाती घेण्यात आलं असून ३१ मार्चपर्यंत हा पूल रुंदीकरणाच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत ३ मीटर रूंदीचा हा जुना पादचारी पूल रुंदीकरणानंतर ६ मीटर रूंदीचा होईल.


प्रवाशांना फायदा

हा पूल प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार असून लांब पल्ल्यांच्या प्रवाशांनाही या पुलाचा फायदा होणार आहे. बोरीवलीत लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही थांबा देण्यात येत असल्याने या स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. पुलाच्या रुंदीकरणानंतर प्रवाशांना त्याचा फायदा होईल.



हेही वाचा-

गुड न्यूज... मुंबईकरांसाठी नवे ५६ पादचारी पूल

'बम्बार्डिअर'चा रेल्वे ट्रॅकवर ताबा, जुन्या 'लोकल' होणार सेवेतून बाद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा