Advertisement

'बम्बार्डिअर'चा रेल्वे ट्रॅकवर ताबा, जुन्या 'लोकल' होणार सेवेतून बाद

आधुनिक बम्बार्डियर लोकल्स आल्यामुळे जुन्या लोकल न वापरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कधी गरज पडली, तरच या लोकल वापरण्यात येतील, असंही सांगण्यात आलं आहे.

'बम्बार्डिअर'चा रेल्वे ट्रॅकवर ताबा, जुन्या 'लोकल' होणार सेवेतून बाद
SHARES

मुंबईतील 'भेल' कंपनीच्या सर्व जुन्या लोकल ट्रेन सेवेतून बाद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. आधुनिक बम्बार्डियर लोकल आल्यामुळे या जुन्या लोकल न वापरण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.


१८ वर्षांचा ऋणानुबंध संपणार

आतापर्यंत 'भारत हेवी इलेक्ट्रिकल्स' (BHEL) या इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या काही लोकल मुंबईत धावत होत्या. १२ डब्यांच्या एकूण ८ भेल लोकल्स मध्य रेल्वेवर सुरू होत्या. २००० सालापासून या लोकल मुंबईकरांच्या सेवेत होत्या. पण, आता आधुनिक बम्बार्डियर लोकल्स आल्यामुळे जुन्या लोकल न वापरण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कधी गरज पडली, तरच या लोकल वापरण्यात येतील, असंही सांगण्यात आलं आहे.


कारण काय?

सतत होणारे तांत्रिक बिघाड, पावसाळ्यात बंद पडणाऱ्या लोकल आणि आगीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचंही म्हटलं जात आहे.

रेल्वे सेफ्टी बोर्डाने २०१४ मध्येच या लोकल बंद करण्याचे आदेश दिले होते. पण, नवीन लोकल उपलब्ध नसल्याने या लोकलचा वापर होत होता. पण, आता बम्बार्डिअर लोकल सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भेल कंपनीच्या जुन्या लोकलची सेवा बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा