Advertisement

फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची कारवाई


फुकट्या प्रवाशांकडून १० कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेची कारवाई
SHARES

उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणं, विना तिकीट प्रवास करणं अशा घटनांची संख्याही वाढतच आहे. अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत १० कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे.


किती जणांवर गुन्हा?

फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने २ लाख ४४ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्याद्वारे पश्चिम रेल्वेने १० कोटी ९६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसंच या महिन्यात ८८५ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून बाहेर हाकलण्यात आलं आहे. तर, ९५ जणांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.


तिकीट दलालांवर कारवाई

तसंच, पश्चिम रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तीं विरुद्धदेखील कारवाई केली. त्यामध्ये १८२ जणांना पकडण्यात आलं असून रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. तसंच १२ वर्षांपेक्षा मोठे असणाऱ्या ४९ विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आलं.

पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये, असं, आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलं आहे.



हेही वाचा-

अाता पश्चिम रेल्वेवरील लोकलही होणार गारेगार

पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही मोबाईल तिकीट व्हेंडिंग ‘कियोस्क’ मशिन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा