लांब पल्ल्याच्या मेमू गाड्या ७ एप्रिलपासून सुरू; डहाणू, विरार रेल्वे प्रवाशांना दिलासा

कोरोना लॉकडाऊनमुळे मागील वर्षी २२ मार्च २०२० पासून मेमू गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. या गाड्या आता पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. मेमू गाड्यांच्या फेऱ्या ७ आणि ८ एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.  यामुळे अनारक्षित गाड्यांमधून प्रवाशांना गुजरात राज्यात प्रवास करता येणार आहे.  डहाणू, विरारच्या रेल्वे प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

विरारहून सुरत, भरूच, वलसाड व डहाणू या ठिकाणी जाणाऱ्या मेमू सेवा ७ व ८ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहेत. तसंच डहाणू ते बोरिवली फेरी, बोरिवली ते वलसाड फेरी सुरू झाल्यावर औद्योगिक कर्मचाऱ्यांनादेखील लाभदायक ठरणार आहे. आता पनवेल-डहाणू रोड आणि बोईसर-दिवा मेमू गाडीच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने  या मागणीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. 

गाड्यांचं वेळापत्रक

सुरत-विरार – मेमू क्रमांक – ०९०८०

६ एप्रिल : सुरतहून संध्याकाळी ६.३५  ला सुटून विरारला रात्री ११.३५ ला  पोहचेल.

सुरत-विरार – मेमू क्रमांक –०९२०२

७ एप्रिल :  सुरतहून संध्याकाळी ४.२५ ला सुटून विरारला रात्री ९.२० ला पोहचेल.

डहाणू-बोरीवली  – मेमू क्रमांक – ०९०८४ 

८ एप्रिल :  डहाणूहून पहाटे ४.५५ ला सुटून बोरीवलीला सकाळी ६.४० ला पोहचेल.

विरार-भरूच  मेमू क्रमांक – ०९१०१

७ एप्रिल :  विरारहून पहाटे ४.३५ ला सुटून भरूचला सकाळी ११.२० ला पोहचेल.

बोरीवली-वलसाड – मेमू क्रमांक –  ०९०८५

८ एप्रिल :  बोरीवलीहून सकाळी ७.२० ला सुटून वलसाडला सकाळी ११.१० ला पोहचेल.

विरार-डहाणू – मेमू क्रमांक – ०९०८३

७ एप्रिल :  विरारहून रात्री १०.५० ला सुटून डहाणूला रात्री १२.१५ ला पोहचेल.



हेही वाचा -

  1. तेजस एक्स्प्रेस एक महिना राहणार बंद
  1. आता एक्स्प्रेसमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग करण्यावर बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या