Advertisement

तेजस एक्स्प्रेस एक महिना राहणार बंद

या गाडीनं प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना त्यामध्ये बदल करावा लागणार आहे.

तेजस एक्स्प्रेस एक महिना राहणार बंद
SHARES

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीनं मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस ही गाडी शुक्रवारपासून पुढील एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या गाडीनं प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना त्यामध्ये बदल करावा लागणार आहे.

लॉकडाऊनमुळं बंद केलेली तेजस एक्स्प्रेस पूर्ण क्षमतेनं १४ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मात्र मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यात आणि मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

त्यामुळं कोरोना नियंत्रणासाठी सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता आयआरसीटीसीनेही २ एप्रिलपासून पुढील एक महिना तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण

  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा