मुख्यमंत्र्यांना मिळणार नवीन हेलिकाॅप्टर

  • मुंबई लाइव्ह टीम & प्रशांत गोडसे
  • परिवहन

एकदा दोनदा नव्हे, तर चक्क चारदा मोठी दुर्घटना हाेता होता वाचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवीन हेलिकाॅप्टर खरेदी करण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे. १४.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून मुख्यमंत्र्यांसाठी सिकोरस्की एस ७६ डी माॅडेलचं हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे. हे हेलिकाॅप्टर लवकरच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दाखल होईल.

कधी झाली होती दुर्घटना?

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॅप्टरमध्ये लातूर, नाशिक, अलिबाग आणि नागपूर अशा चार ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला होता. यातील दोन घटनांमध्ये मुख्यमंत्री मोठा अपघात होताना थोडक्यात बचावले होते. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यासाठी नवीन हेलिकाॅप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव अग्रक्रमावर ठेवला होता. त्यानुसार लॉकहिड मार्टिन कंपनीकडून सरकार सिकोरस्की एस- ७६ डी हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. यासंदर्भातील घोषणा लाॅकहिड मार्टिन कंपनीने इंग्लडमधील फर्नबोरो इंटरनॅशनल एअर शो इथं केली.

'अशी' झाली निवड

मुख्यमंत्र्यांसाठी हेलिकाॅप्टरची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीत वायूदल, नौदल, तटरक्षक दल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने सिकोरस्की एस- ७६ डी सोबतच ऑगस्टा वेस्टलँड १३९ आणि एअरबसच्या एच १४५ हेलिकॉप्टर्सची निवड केली होती. त्यातील सिकोरस्की हेलिकाॅप्टरला अंतिम पसंती देण्यात आली. हे हेलिकाॅप्टर २०१९ मध्ये मिळणार आहे.

हेलिकाॅप्टरची क्रेझ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि हाॅलिवूड सेलिब्रिटी यांनीही सिकोरस्की एस- ७६ डी हेलिकॉप्टर वापरलेलं आहे.


हेही वाचा-

सीएमची 'अशी'ही हॅटट्रीक, तिसऱ्यांदा हेलिकाॅप्टर अपघातातून वाचले

म्हणून सरकार करणार नवीन हेलिकॉप्टरची खरेदी


पुढील बातमी
इतर बातम्या