Advertisement

म्हणून सरकार करणार नवीन हेलिकॉप्टरची खरेदी


म्हणून सरकार करणार नवीन हेलिकॉप्टरची खरेदी
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा दुर्घटनाग्रस्त झालं होतं. पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. त्यामुळेच राज्यातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला.


कधी करणाक खरेदी?

राज्य सरकार सिर्कोस्की कंपनीचं S76-D हे हेलिकॉप्टर सुमारे १२७ कोटी रुपयांना विकत घेणार आहे. या हेलिकॉप्टरची क्षमता १३ प्रवासी वाहून नेण्याची असेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हा निर्णय महिनाभरापूर्वी घेतला होता. आता हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय जाहीर केला आहे. पण नवीन हेलिकॉप्टर प्रत्यक्ष राज्यात दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.


मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर 3 वेळा दुर्घनाग्रस्त

गेल्या वर्षी २५ मे रोजी मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर असताना निलंगे येथे त्यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला होता. त्यांच्या हेलिकाॅप्टरने उड्डाण घेताच हेलिकाॅप्टरची पाती वीजेच्या तारांमध्ये अडकल्याने मोठा अपघात झाला. यावेळी मुख्यमंत्री आणि त्यांचे स्वीय सहायक हेलिकाॅप्टरमध्ये होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

दुसरा अपघात ७ जुलै रोजी अलिबागमध्ये झाला. मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरमध्ये बसण्याआधीच तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांना तात्काळ दूर नेण्यात आलं. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर याच हेलिकाॅप्टरने मुख्यमंत्र्यांनी मुंबई गाठलं.

त्यानंतर पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री नाशिकहून औरंगाबादला हेलिकाॅप्टरने निघाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. सोबत हेलिकाॅप्टरमध्ये बरंच सामानही होतं. हेलिकाॅप्टरने उड्डाण करताच जास्त वजनामुळे त्याचा समतोल बिघडल्याने पायलटने इमर्जन्सी लँडिंग केलं. त्यानंतर काही जणांना हेलिकाॅप्टरमधून उतरवण्यात अालं. भार हलका झाल्यानंतर हेलिकाॅप्टरने पुन्हा उड्डाणं केलं. तसं केलं नसतं तर अपघाताची शक्यता होती.


हेही वाचा - 

राज्य सरकार घेणार वादग्रस्त ऑगस्ता वेस्टलँड कंपनीची हेलिकॉप्टर्स भाड्याने

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा