Advertisement

सीएमची 'अशी'ही हॅटट्रीक, तिसऱ्यांदा हेलिकाॅप्टर अपघातातून वाचले


सीएमची 'अशी'ही हॅटट्रीक, तिसऱ्यांदा हेलिकाॅप्टर अपघातातून वाचले
SHARES

'देव तारी, त्याला कोण मारी...' अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार घेताहेत. एकदा, दोनदा नव्हे, तर तिसऱ्यांदा हेलिकाॅप्टर अपघातातून सुखरूप वाचत सीएमनी अनोखी हॅटट्रीक केली अाहे.

त्याचं झालं असं की मुख्यमंत्री शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नाशिकहून औरंगाबादला हेलिकाॅप्टरने निघाले होते. हेलिकाॅप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. सोबत हेलिकाॅप्टरमध्ये बरंच सामानही होतं. हेलिकाॅप्टरने उड्डाण करताच जास्त वजनामुळे त्याचा समतोल बिघडल्याने पायलटने इमर्जन्सी लँडिंग  केलं.

त्यानंतर काही जणांना हेलिकाॅप्टरमधून उतरवण्यात अालं. भार हलका झाल्यानंतर हेलिकाॅप्टरने पुन्हा उड्डाणं केलं. तसं केलं नसतं तर अपघाताची शक्यता होती. मोठा अनर्थ टळला असला तरी सीएमवर पुन्हा अशी वेळ न येवो, हिच सर्वांची इच्छा असेल.



यापूर्वीच्या घटना

यापूर्वी २५ मे रोजी मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर असताना निलंगे येथे त्यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला होता. त्यांच्या हेलिकाॅप्टरने उड्डाण घेताच हेलिकाॅप्टरची पाती वीजेच्या तारांमध्ये अडकल्याने मोठा अपघात झाला. यावेळी मुख्यमंत्री आणि त्यांचे स्वीय सहायक हेलिकाॅप्टरमध्ये होते. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

त्यानंतर दुसरा अपघात ७ जुलै रोजी अलिबागमध्ये झाला. मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरमध्ये बसण्याआधीच तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांना तात्काळ दूर नेण्यात आलं. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर याच हेलिकाॅप्टरने मुख्यमंत्र्यांनी मुंबई गाठलं. त्यानंतर अवघ्या ६ महिन्यांच्या आत पुन्हा ही घटना घडल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.



हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा