मुख्यमंत्री पुन्हा थोडक्यात बचावले; नाहीतर घडला असता अनर्थ!


  • मुख्यमंत्री पुन्हा थोडक्यात बचावले; नाहीतर घडला असता अनर्थ!
SHARE

अलिबाग भेटीवर गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी दुपारच्या सुमारास मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र सुरक्षारक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे यामध्ये मुख्यमंत्री किंवा इतर कुणालाही इजा न होता सर्वजण सुखरुप पुढच्या प्रवासाला रवाना झाले.


..आणि मुख्यंत्र्यांना त्यांनी खाली खेचलं

शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास अलिबागमधील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे परतण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये चढू लागले. मात्र ते हेलिकॉप्टरमध्ये चढण्याआधीच हेलिकॉप्टर सुरु झाले. हेलिकॉप्टर दोन फुटांवर गेले असतानाच सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री बचावले. हेलिकॉप्टरच्या पंख्यापासून अवघ्या काही इंचांवरुन मुख्यमंत्र्यांना खाली खेचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर, पंख्याची तांत्रिक तपासणी केल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले. दुपारी चारच्या सुमारास मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सुखरुप पोहोचले.मुख्यमंत्री कार्यालयाचा इन्कार

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र या घटनेचा इन्कार करण्यात आला आहे. किंबहुना अपघात घडला नसून कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांचा मात्र दुजोरा

मात्र, एकीकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अपघात झाला नसल्याचं सांगण्यात येत असलं, तरी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच, यामध्ये मुख्यमंत्री किंवा इतर कुणालाही इजा झालेली नसून सर्वजण सुखरुप असल्याचेही सांगण्यात आले आहे.


दोन महिन्यांत दुसरी घटना

अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच 25 मे 2017 रोजी लातूरमध्ये मुख्यंमत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यामुळे मोठा गहजब उडाला होता. जमिनीपासून काही फुटांवर गेल्यानंतर विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे हेलिकॉप्टर खाली कोसळले होते. विमान जास्त उंचावर न गेल्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले इतर तीन जण या अपघातातून सुखरुप बचावले होते.हेही वाचा

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या