मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसहून सुटणार लांब पल्ल्याच्या गाड्या

एल्फिस्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी, रेल्वे प्रशासनानं परळ टर्मिनसचं उभारणी केली. तसंच, दादर स्थानकात देखील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळं दादर स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी परळ टर्मिनसहून १६ अप आणि डाऊन लोकल सुरु करण्यात आल्या. मात्र, भविष्यात याच परळ स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१४ हेक्टर जागेवर टर्मिनस

मध्य रेल्वे मार्गावरील परळ स्थानकात टर्मिनस प्लॅटफॉर्मची निर्मिती झाल्यानंतर या स्थानकाच्या शेजारी असलेल्या परळ लोको वर्कशॉपच्या १४ हेक्टर जागेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना सोडण्यासाठी नवं परळ टर्मिनस बांधण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांना हे लांबपल्ल्याचं टर्मिनस जोडलं जाणार आहे.

१९० कोटींचा खर्च

उपनगरीय लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी हे टर्मिनस फायदेशीर ठरणार आहे. तसंच, परळ वर्कशॉपच्या १४ हेक्टर जागेवर हे टर्मिनस बांधण्यात येणार असून या बांधकामासाठी १९० कोटींचा खर्च येणार आहे. तसंच, या टर्मिनसहून २९ मेल व एक्स्प्रेस सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा -

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, एक महिला जखमी

उर्मिला मातोंडकरचा गोपाल शेट्टींसमोर टिकाव लागणार?


पुढील बातमी
इतर बातम्या