डिसेंबर २०१७ आधी विकलेल्या वाहनांसाठी देखील FASTag अनिवार्य

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं डिसेंबर 2017 आधी विक्री केलेल्या जुन्या वाहनांमध्ये जानेवारी २०२१ पासून FASTag अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर १ डिसेंबर २०१९ पासून सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहनांवर-चारचाकी वाहनांसाठी FASTag अनिवार्य केला होता.

१ डिसेंबर २०१७ पूर्वी ज्या वाहनांची नोंद झाली आहे त्यांच्यामध्ये पुढील वर्षी जानेवारीपासून FASTag असणं बंधनकारक असेल. त्याशिवाय एप्रिल २०२१ पासून थर्ड पार्टी इन्शूरन्स प्रभावी करण्यासाठी फास्टॅग सक्तीचं करण्याचा प्रस्तावही मंत्रालयानं ठेवला आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानंही एक अधिसूचना जारी केली आहे.

मंत्रालयानं असं म्हटलं आहे की, केंद्रीय मोटर वाहन नियम-१९८९ नुसार, २०१७ पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी FASTag अनिवार्य करण्यात आले आहे. वाहन निर्माता किंवा त्यांच्या डीलरद्वारे याचा पुरवठा करणं देखील बंधनकारक आहे. त्यानुसार M आणि N वर्गातील मोटर वाहनांमध्ये (चारचाकी) फास्टॅग सक्तीचं करण्यासाठी CMVR, १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जानेवारी २०२१ पासून लागू होईल.


हेही वाचा

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीत २ आसनांमध्ये पडदे

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर

पुढील बातमी
इतर बातम्या