Advertisement

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीत २ आसनांमध्ये पडदे

सध्या ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी महामंडळानं २ आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीत २ आसनांमध्ये पडदे
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवणारी बंद ठेवण्यात आली होती. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यात येत होती. परंतु, हळुहळू एसटी महामंडळानं एसटीमधील प्रवासी संख्येत वाढ केली आहे. त्यामुळं प्रवाशांना प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं २ आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ५० टक्के  प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी महामंडळानं २ आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळानं दिली. एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळं एसटीचं उत्पन्न कमी झालं आहे.

ही परिस्थिती पुढेही सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं उत्पन्न वाढावं व खर्च बचतीसाठी यावर उपाय म्हणून पूर्ण प्रवासी क्षमतेनं एसटी चालवण्याच्या विचारात महामंडळ आहे. त्यासाठी २ आसनांवर बाजूबाजूला बसलेल्या प्रवाशांमध्ये पडदे बसवण्यात येणार आहेत.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा प्रस्ताव गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडं मंजुरीसाठी पाठवल्याचं माहिती मिळते. त्याचप्रमाणं २ बसमध्ये पडदे बसवण्यात आलं असून, राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची चाचपणी केली जाणार असल्याचीही माहिती मिळते.



हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी घटला

सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा