मोनोरेलमध्ये आता लग्नही लागणार

 मुंबई मोनोरेल (Monorail) मध्ये आता लग्न, वाढदिवस करता येणार आहे. मुंबई मोनोरेल (Monorail) लग्न, वाढदिवस यांसारख्या सेलिब्रेशनसाठी भाड्याने देण्याचा निर्णय एमएमआरडीएने (MMRDA) घेतला आहे. यामधून डबघाईला आलेल्या मोनोरेलची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असं एमएमआरडीएला वाटत आहे. 

मुंबईत ७ वर्षांपूर्वी मोनोरेल सुरू झाली. तब्बल २७०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. मोनोरेलला सध्या रोज ८.५ लाख रुपयांचा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एमएमआरडीएने हा अनोखा मार्ग शोधला आहे. गर्दी नसण्याच्या वेळेत मोनोरेल या कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात येणार आहेत. यामुळे पडून राहणाऱ्या गाड्यांचा पैसे कमावण्यासाठी वापर करता येईल. 

फेब्रुवारीपर्यंत दररोज १५ हजार प्रवासी संख्या वाढवण्याच्या तर येत्या काही महिन्यांमध्ये प्रवासी संख्या २५ हजारपर्यंत वाढ करण्याचा एमएमआरडीए प्रयत्न करत आहे. यासाठी मोनोरेल मार्फत अन्य काही भाग देखील जोडून घेण्याचा विचार आहे, तसेच दोन रुळांची संख्या वाढवून गाड्यांमधील जास्तीत जातीस अंतर हे १५ मिनिट करता येईल असाही विचार सुरु आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीला मोनोरेलमधून  ६ कोटी प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा होती. मात्र आतापर्यंत केवळ ४६ लाख प्रवाशांचा टप्पाच पार करता आला आहे.


हेही वाचा -

केतकी चितळेला फेसबुक पोस्ट भोवणार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

२ दिवसांत १०२८ किलो प्लास्टिक जप्त


पुढील बातमी
इतर बातम्या