Advertisement

२ दिवसांत १०२८ किलो प्लास्टिक जप्त

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) २ दिवसांत १०२८ किलो प्लास्टिक (plastic) जप्त केलं आहे.

२ दिवसांत १०२८ किलो प्लास्टिक जप्त
SHARES

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) २ दिवसांत १०२८ किलो प्लास्टिक (plastic) जप्त (Seized) केलं आहे. प्लास्टिक बाळगणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करून पालिकेने ३ लाख ७५ हजार रुपये दंड (Penalties) वसूल केला आहे. सर्वाधिक प्लास्टिकचा साठा मशिद बंदर येथे आढळला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

राज्यात १ मार्चपासून प्लास्टिकवर (plastic) बंदी घालण्यात आली आहे.  मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) मे २०२० पर्यंत प्लास्टिकमुक्त मुंबई करण्याचा निर्धार केला आहे. यानुसार पालिकेने आता रविवारपासून कारवाईचा धडाका सुरु केला आहे.  मुंबईतील सर्व वॉर्डातील ४०८१ आस्थापनांना संबंधित अधिका-यांनी भेटी दिल्या. यावेळी १०२८  किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ३ लाख ७५ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. एका दुकानदारांने दंड देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत दुकाने व फेरीवाल्यांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आलं आहे. 

 महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मंडईतील गाळेधारक, फेरीवाले आणि दुकानांसह मंगल कार्यालय, उपहारगृह, कार्यालयांमध्येही तपासणी केली जाते आहे. प्रतिबंधित प्लास्टिक  (plastic) आढळल्यास कडक कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह सर्वांनी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करु नये, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जून २०१८  पासून आतापर्यंत मुंबईत १६ लाख ४४०५ आस्थापनांना भेटी देऊन ९५ हजार किलोग्रॅमहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या आस्थापनांकडून ४ कोटी ६७  लाख ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.



हेही वाचा -

निवासी डॉक्टरांना आता ११ हजार रुपये विद्यावेतन

केतकी चितळेला फेसबुक पोस्ट भोवणार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा