Advertisement

निवासी डॉक्टरांना आता ११ हजार रुपये विद्यावेतन

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) रुग्णालयांतील (hospital) निवासी डॉक्टरांना (Resident doctor) आता ११ हजार रुपये विद्यावेतन (stipend) मिळणार आहे.

निवासी डॉक्टरांना आता ११ हजार रुपये विद्यावेतन
SHARES

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) रुग्णालयांतील (hospital) निवासी डॉक्टरांना (Resident doctor) आता ११ हजार रुपये विद्यावेतन (stipend) मिळणार आहे. विद्यावेतनात ५ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई पालिकेची केईएम, नायर, सायन, कुपर ही वैद्यकीय महाविद्यालये व नायर दंतमहाविद्यालय आहे. या विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना सध्या ६ हजार रुपये विद्यावेतन मिळतं. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात २०१२ नंतर वाढ करण्यात आलेली नाही.  त्यामुळे ऑगस्ट २०१९ मध्ये विद्यावेतनात ५ हजार रूपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ऑगस्ट २०१९ च्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही वाढ होणार आहे. त्यामुळे शिकाऊ डॉक्टरांना सात महिन्यांची ३५ हजार रुपयांची थकबाकी मिळणार आहे.

निवासी डॉक्टरांना Resident doctor) रुग्णालयात चिकित्सक व शैक्षणिक अशा स्वरूपाची कामे असतात. विविध विभागांत उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना हे विद्यार्थी सेवा देतात. तसंच रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातही हे विद्यार्थी रुग्णसेवा देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यावेतन (stipend) वाढवून देण्याची मागणी नगरसेवकांसह डॉक्टरांनी केली होती.



हेही वाचा -

उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्यास पालिकेचा नकार

जमिनीच्या वादातून टोकाची भूमिका, आई-वडिलांसह पाच वर्षांच्या मुलीची आत्महत्या




 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा