Advertisement

उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्यास पालिकेचा नकार

सांताक्रूझ-चेंबूर (Santa Cruz-Chembur) जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला (DOUBLE DECKER FLYOVER) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी मुंबई महापालिका प्रशासनाने फेटाळली आहे.

उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्यास पालिकेचा नकार
SHARES

सांताक्रूझ-चेंबूर (Santa Cruz-Chembur) जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला (DOUBLE DECKER FLYOVER) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने फेटाळली आहे. या जोडरस्त्यास भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे यापूर्वीच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे दुमजली उड्डाणपुलाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देता येणार नाही असं प्रशासनाने सांगितलं आहे.  यावरून आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस व नेहरू नगर आणि स. गो. बर्वे मार्ग, कुर्ला ते अमर महल, टिळकनगर यांना जोडणारा हा दुमजली उड्डाणपूल आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कुर्ला (पश्चिम) मिठी नदी ते चेंबूर (पूर्व द्रुतगती मार्ग, छेडा नगर जंक्शनदरम्यान सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता उभारला आहे.  हा जोडरस्ता मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) प्रमुख अभियंता (पूल) यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. पालिकेच्या ९ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या ठरावानुसार या जोडरस्त्याचे गोपीनाथ मुंडे सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोड असं नामकरण करण्यात आलं आहे. 

या जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेना नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी स्थापत्य समिती (उपनगर) च्या अध्यक्षांना पत्र पाठवून केली होती. या पत्रावर प्रशासनाने आपला अभिप्राय दिला आहे. हा दुमजली उड्डाणपूल सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्त्याचाच भाग असून या रस्त्याला यापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांचं नाव दिलं आहे. त्यामुळे दुमजली उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देता येणार नाही, असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे. तसंच जोगेश्वरी पूर्व-पश्चिम विभाग जोडणाऱ्या जोगेश्वरी दक्षिण उड्डाणपुलास बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

जमिनीच्या वादातून टोकाची भूमिका, आई-वडिलांसह पाच वर्षांच्या मुलीची आत्महत्या

एकाच नंबरच्या दोन नोटा ? व्यापाऱ्यांना ८० लाखाला गंडवले




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा